पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सायकलवारी अल्पपरिचित लेण्यांची

इमेज
भंडारा लेणी, माणचं एकुटवाणं विहार लेणं आणि फिरंगाईचं गुहामंदिर साधारणपणे लेणी म्हंटलं की बहुतांशी लोकांच्या डोळ्यासमोर येतात ती कार्ले, भाजे, अजिंठा, वेरूळ यांसारखी काही कलाकुसरयुक्त आणि बोटांवर मोजण्याइतकी लेणी. हवं तर हा लेख वाचण्याआधी, प्रयोग म्हणून करून पहा की, आपल्याला किती लेण्यांची नावं माहित आहेत? मी ही काही तुमच्याहून वेगळा नाही, काही वर्षांपूर्वी मलाही बोटांवर मोजण्याइतक्याच लेण्या ठाऊक होत्या. पण मागच्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञानाच्या कृपेने, किल्ले आणि सह्याद्रीसारख्या आवडीच्या विषयांवर वाचन आणि श्रवण करता करता,  "प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास" ह्याविषयीची उत्कंठा वाढत गेली आणि मग माझ्या बुद्धीला झेपेल तितक्या सखोलात शिरून माहिती मिळवण्याची सुरुवात झाली. त्यातलाच एक भाग, म्हणजेच  "लेणी"  ह्या विषयावर बरीचशी माहिती मिळत गेेली आणि लेण्यांबद्दलचे काही आकडेही समोर आले. तर, अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारतात साधारण १६०० कोरीव लेणी आहेत, त्यातली १२०० (म्हणजे ७५%) लेणी ही महाराष्ट्रात आहेत, त्यातल...