पोस्ट्स

Indian Railways लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संपले बालपण माझे

इमेज
शीर्षक वाचून , " फारच लवकर कळालंय ह्याला !!" अशी तुमची समजूत होणं स्वाभाविक आहे. पण मनातून अशाच भावनेची स्पंदनं निर्माण होतायेत. बालपण संपत चाललंय अशी चाहूल लागू पाहतेय. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे । खिडकीवर धूरकट तेव्हा कंदील एकटा होता ।। कवी ग्रेसांच्या ह्याच ओळी डोक्यात घोळतायेत. "वेळ" आणि "कारण" मात्र खूपच वेगळं आहे आणि त्याला ग्रेस असते तर त्यांनीही हरकत नक्कीच घेतली नसती. माझ्या ह्या अवस्थेचं कारण प्रथमदर्शी हास्यास्पद वाटू शकेल किंवा असेलही. पण कदाचित पूर्ण वाचून झाल्यावर तुम्ही माझ्याशी एकमत होऊ शकाल. एकमत व्हावंच अशी अपेक्षा मात्र नाही. तर थोडक्यात सांगायचं झालं तर , माझ्यासाठी कवितेतील "खिडकी" म्हणजे "खंडाळा किंवा बोर घाटातला जुना लोहमार्ग". आणि "धूरकट कंदील" म्हणजे ५-एप्रिल-२०२० ह्या दिवशी इतिहासजमा झालेला "अमृतांजन पूल". (आता ह्या कल्पनेतून पुन्हा एकदा कवितेच्या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करून बघा) कधी कधी निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा जीव गुंतलेला असतो. इथे एक शंका आहे खरं तर....