पोस्ट्स

Chakan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर

इमेज
पायी असो वा सायकलस्वार व्हावे । आरोग्य सुदृढ आपुले करावे ॥ अवचित समयी वाहनारूढ व्हावे । सह्याद्री ओढीने भारून जावे ॥ भर्राट वारा तो यथेच्छ प्यावा । अंतरीचा गा प्राणाग्नि चेतवावा ॥ आनंदे विहार अवघा करावा । व्यासंग अभ्यास तोही घडावा ॥ इतिहास जाणूनी प्रेरित व्हावे । आयुष्य समृद्ध होऊनी जावे ॥ निसर्ग इतिहास भाषा जपावी । भावी पिढीस जतनासी द्यावी ॥ पश्या म्हणे महाराष्ट्राटन ऐसे व्हावे । क्षण वेचले लेखणीतूनी द्यावे ॥ शेवटच्या ओळीवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की, हे कोण्या महान संतांचं वचन नसून मज पामराचंच बरळणं आहे. पण ते अगदी मनाच्या गाभाऱ्यातून आलंय तेव्हा तुमच्यासमोर मांडायला संकोच वाटला नाही. माझ्या अल्पमतीला सुचलेलं गोड मानून घ्यावं ही विनंती. चला !! आजच्या विषयाकडे वळूयात. शाळा आणि महाविद्यालयानंतर, म्हणजे २००३ साली हातातून आणि पायातूनही सुटलेली सायकल, तब्बल दहा वर्षांच्या खंडानंतर, २०१३ ला पुन्हा एकदा आयुष्यात आली ती एका नव्या गोजिरवाण्या रूपात आणि हातून गमावत चाललंय की काय असं वाटणारं आयुष्य आणि आरोग्य परत...