पोस्ट्स

Jambhavali Bhimashankar Trek लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...

इमेज
।। खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...।। दिनांक: ३० डिसेम्बर २०१७ ते १ जानेवारी २०१८ भटकंती: जांभवली ते भीमाशंकर  भटकर्स: टीम झेनिथ ओडिसीज् आयुष्याची ३६ वर्षे उलटून गेल्यावर ह्या दोन देवतांचा दूत बनून जाण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. तीन दिवसांच्या ह्या प्रवासाचा थोडक्यात वृत्तांत देण्याचा हा प्रयत्न. दिनांक ३० डिसेम्बर २०१७ - जांभवली ते तळपेवाडी (१२ किमी डोंगरयात्रा आणि १८ किमी गाडी प्रवास) सकाळी ७.३० ला कामशेत स्टेशनात आमचा जत्था जमला. पुरेसं उदरभरण झाल्यावर जांभवली फाट्यावर आलो. एका जीपने आम्हाला जांभवलीमधे पोहचतं केलं तेव्हा ९.३० वाजले होते. उतरून तडक कोंडेश्वराकडे चालत निघालो. कोंडेश्वरावरून दिसणाऱ्या ढाकच्या कातळाने सहाव्यांदा त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं. कोंडेश्वराला नमन करून खलिता हाती घेतला आणि प्रयाण केले तेव्हा १० वाजले होते.  सह्याद्रीच्या भरभक्कम कण्याने आमचं वजन पेललं. ढाकच्या वाटेवरचा पहिला डोंगर चढलो. पुढे त्याच वाटेने थोडंसं जंगलाकडे उतरल्यावर भीमाशंकराकडे जाणारा फाटा दृष्टीक्षेपात आला. इथून पुढची वाट माझ्यासाठी नवी होत...