पोस्ट्स

Samrajgad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन दिवस सहा किल्ले

इमेज
अवचितगड, घोसाळगड, तळागड, पद्मदुर्ग, सामराजगड, बिरवाडी !!! दिनांक : २ व ३ एप्रिल २०१६ : भटकंती : अवचितगड , घोसाळगड , तळगड , पद्मदूर्ग , सामराजगड , बिरवाडी . भटकर्स : रॉक हार्ट्स संघ - हर्षद , प्रसाद , महेश , जयवंत , अर्चनाताई आणि अश्विनी . आग पाखडणाऱ्या भयंकर उन्हाळ्यात   ऐन   कोकणातील ह्या भटकंतीची योजना करणं म्हणजे आमच्यातील सोशिकपणा आणि चिकाटी यांची निव्वळ परीक्षा पाहण्यासारखंच होतं . ही योजना करणं म्हणजे मूर्खपणा असेलही पण आम्हाला हा करून बघायचाच होता . मोहीम आखली गेली . ५ किल्ले ( अवचित , घोसाळगड, तळागड , पद्मदूर्ग , बिरवाडीचा किल्ला ) आणि एक लेणीसमुह ( कुडे ) अशी मूळ मोहीम होती . दिनांक २ एप्रिल २०१६ : ठरल्याप्रमाणे मी , जयवंत आणि अर्चनाताई पहाटे  (खरंतर रात्री) २ वाजता माझ्या टाटा निर्मित रणगाड्याने ( कौतुक आहे मला माझ्या ह्या दर ट्रेकला साथ देणाऱ्या रणगाड्याचं ) प्रस्थान केले . पहाटे ३ : ३० ला खोपोली जवळील शिळफाटा येथे पोहचलो . रॉक हार्ट्स संघाचा   म्होरक्या ...