पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!

इमेज
अपरिचित वाघोली, फुलगावचा देखणा घाट आणि तुळापूर बोलू लागलं !! सवयीनं आठवड्यात एखाद्या दिवशी उषःप्रहरी उठावं आणि अंधारातच एकुटवाणं... नाही नाही !! रानभुलीसवे निघावं. (रानभुली कोण? विसरलात? मग आधी हे वाचा !!) कुठं जायचं ते रानभुलीला नेमकं ठाऊक असतं. अर्ध्या-पाऊण तासात ती मला, माझ्या आवडत्या नेमक्या टेकाडापाशी पोहचवते. आम्ही दोघंही मग अर्ध टेकाड चढून नेहमीच्या धोंड्यावर कोणाची तरी वाट पाहत बसतो. अजूनही अंधाराचंच साम्राज्य असतं. वारा दमून-भागून झोपलेला असला तरी त्याची उणीव हवेतला गारवा भरून काढत असतो. समोर भला मोठा काळसर निळा किंतानाचा पट (कॅनव्हास) क्षितीजापार पसरलेला असतो. त्यावर उगा कोण्या खोडकराने कुंचला फटकारून उडवलेल्या लहान-मोठ्या पांढुरक्या ठिपक्यांसारख्या चांदण्या लुकलुकत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणारे गावातले काही दिवे उगाच ऐट मिरवत असतात. आणि मग काही क्षणांतच त्याची चाहूल लागते. तो येतो... पांढरा शुभ्र ढगळ अंगरखा, तितकेच शुभ्र डोई-दाढीचे लांबसडक केस, बारीक पाणीदार डोळे, चेहर्यावर सुरकुत्यांचं जाळं, तिच गत हातांची आणि लांबसडक बोटांची !! वय किती असावं? माहीत नाही ...

एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन

इमेज
तसं पाहिलं तर ह्या विषयावर काही लिहावं, असा काही माझा विचार नव्हता. नेहमीप्रमाणे मी, माझा एक सायकलानुभवच लिहायला बसलो होतो पण विचारांनी, मनाचा आणि हातांचा ताबा घेतला आणि सायकालानुभव बाजूला ठेऊन कागदावर वेगळीच आणि  अनपेक्षित अक्षरं उमटायला लागली. मग मीही स्वतःला विचारांच्या आधीन केलं आणि विचार हातांकडून काय लिहून घेतात ते निमूटपणे पाहत राहिलो. त्यातूनच ह्या एका वेगळ्याच प्रवासवर्णनाचा जन्म झाला. मागे एकदा, माझ्या एका लिखाणात मी म्हणालो होतो की, चराचर ह्या संकल्पनेत स्थान असलेल्या कुठल्याही अचल गोष्टीला   "निर्जीव" म्हणणं, मला तरी रुचत नाही. अगदी बालपणापासून ते आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली कुठलीही अचल गोष्ट  (ठिकाण / निसर्गाचा घटक / वस्तू इ. )  ही "सजीव च " आहे असं मी मानत आलो आहे. त्यातल्याच काही गोष्टींशी तर अगदी (सजीवांपेक्षा काकणभर जास्तच) आपुलकीचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे " सायकल". सायकलला नुसतं "सायकल" असं म्हणण्यात, मला एक प्रकारचा निर्जी...