पोस्ट्स

ओढाळ वासरू रानी आले फिरू

इमेज
मोरगिरी, संग्रामदुर्ग, कैलासगड, ढवळगडावरचा उल्कावर्षाव आणि कऱ्हेपठारावरचं प्राचीन शिल्पवैभव असं बरंच काही !!! ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडुनिया कानांमध्ये वारे भरूनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ मोकाट मोकाट, अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पुन्हा पाचवीचा अभ्यास चालू केला की काय? लेखनाची सुरुवात पद्याने करायचा नवीन छंद जडलाय का? वगैरे वगैरे... पण खरंच, मला २०२० चं वर्ष, सरता सरता जे काही आनंद देऊन गेलं त्याचा लेखन-प्रपंच मांडायला घेतला आणि कवी अनिलांचं अवखळ वासरू डोळ्यासमोर उड्या मारायला लागलं. पुणे जिल्ह्यात मला ज्ञात असलेले उणे-अधिक बत्तीस तरी गिरीदुर्ग आहेत. त्यातले तीन दुर्ग (मोरगिरी, कैलासगड आणि ढवळगड) वगळले तर बाकी दुर्गांना आजपर्यंत किमान एकदा तरी भेट देऊन झाली आहे. पण उर्वरित तीन दुर्ग पाहण्याचा योग काही येत नव्हता. ठरवल्याप्रमाणे २०२० च्या सुरुवातीला प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातले तीन दुर्ग (मांजरसुभा, नगरचा भुईकोट व जामगावचा भ...

सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर

इमेज
पायी असो वा सायकलस्वार व्हावे । आरोग्य सुदृढ आपुले करावे ॥ अवचित समयी वाहनारूढ व्हावे । सह्याद्री ओढीने भारून जावे ॥ भर्राट वारा तो यथेच्छ प्यावा । अंतरीचा गा प्राणाग्नि चेतवावा ॥ आनंदे विहार अवघा करावा । व्यासंग अभ्यास तोही घडावा ॥ इतिहास जाणूनी प्रेरित व्हावे । आयुष्य समृद्ध होऊनी जावे ॥ निसर्ग इतिहास भाषा जपावी । भावी पिढीस जतनासी द्यावी ॥ पश्या म्हणे महाराष्ट्राटन ऐसे व्हावे । क्षण वेचले लेखणीतूनी द्यावे ॥ शेवटच्या ओळीवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की, हे कोण्या महान संतांचं वचन नसून मज पामराचंच बरळणं आहे. पण ते अगदी मनाच्या गाभाऱ्यातून आलंय तेव्हा तुमच्यासमोर मांडायला संकोच वाटला नाही. माझ्या अल्पमतीला सुचलेलं गोड मानून घ्यावं ही विनंती. चला !! आजच्या विषयाकडे वळूयात. शाळा आणि महाविद्यालयानंतर, म्हणजे २००३ साली हातातून आणि पायातूनही सुटलेली सायकल, तब्बल दहा वर्षांच्या खंडानंतर, २०१३ ला पुन्हा एकदा आयुष्यात आली ती एका नव्या गोजिरवाण्या रूपात आणि हातून गमावत चाललंय की काय असं वाटणारं आयुष्य आणि आरोग्य परत...

संपले बालपण माझे

इमेज
शीर्षक वाचून , " फारच लवकर कळालंय ह्याला !!" अशी तुमची समजूत होणं स्वाभाविक आहे. पण मनातून अशाच भावनेची स्पंदनं निर्माण होतायेत. बालपण संपत चाललंय अशी चाहूल लागू पाहतेय. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे । खिडकीवर धूरकट तेव्हा कंदील एकटा होता ।। कवी ग्रेसांच्या ह्याच ओळी डोक्यात घोळतायेत. "वेळ" आणि "कारण" मात्र खूपच वेगळं आहे आणि त्याला ग्रेस असते तर त्यांनीही हरकत नक्कीच घेतली नसती. माझ्या ह्या अवस्थेचं कारण प्रथमदर्शी हास्यास्पद वाटू शकेल किंवा असेलही. पण कदाचित पूर्ण वाचून झाल्यावर तुम्ही माझ्याशी एकमत होऊ शकाल. एकमत व्हावंच अशी अपेक्षा मात्र नाही. तर थोडक्यात सांगायचं झालं तर , माझ्यासाठी कवितेतील "खिडकी" म्हणजे "खंडाळा किंवा बोर घाटातला जुना लोहमार्ग". आणि "धूरकट कंदील" म्हणजे ५-एप्रिल-२०२० ह्या दिवशी इतिहासजमा झालेला "अमृतांजन पूल". (आता ह्या कल्पनेतून पुन्हा एकदा कवितेच्या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करून बघा) कधी कधी निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा जीव गुंतलेला असतो. इथे एक शंका आहे खरं तर....